इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्यासाठी इस्लामेतर व्यक्तीला उद्युक्त करणे आणि जो याला विरोध करील त्याच्याशी युद्ध करणे वा पुकारणे." अशी सरळ जिहादची व्याख्या आहे. इस्लाममध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचा आधार घेतला तर जिहादचे बरेच प्रकार आहेत, जसे की तलवारीने, मौखिक म्हणजे बोलून बुद्धिभेद करून आणि मनाने म्हणजे मनातल्या मनात एखाद्याची निंदानालस्ती चालवणे इत्यादी. कुराण ९.७३ (सुराह ९ आयत क्रमांक ७३) व ६६.९ सांगतात, "काफिर (इस्लामेतर) लोकांशी जिहाद करा, त्यांच्यावर सक्ती करा." जिहादचा उगम अश्या कुराण व हदीज मधील संदर्भातून आहे. त्यामुळे इस्लाम व कुराण म्हणजे पवित्र व काही मुसलमान तेवढे वाईट असतात या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. कारण जिहादची जडच कुराण हा इस्लामिक धार्मिक ग्रंथ आहे! पुढे जाऊन कुराण ३.२८ आणि ४७.४ नुसार आदेश देते की, काफ़िरांशी दोस्ती करू नका. आणि काफ़िरांची गर्दन उडवा. त्यामुळे तुमचा आज असणारा मुसलमान मित्र वरून आदेश/फतवा निघताच तुमचीच गर्दन उडवायला मागेपुढे बघणार नाही.


आता आपण लव्ह जिहाद वर बोलू. सदर जिहाद इस्लामेतर स्त्रियांना प्रेम जाळ्यात ओढून, black mail करून, फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे तसेच सोबत इस्लामेतर धर्मांच्या प्रजनन व कुटुंब व्यवस्थेवर आघात करणे या उद्देशाने केला जातो. कारण स्त्री ही प्रजनन व वंश विस्ताराच्या प्रमुख भूमिकेत असते. त्यामुळे हा मुळांवर घाव घालणारा आणि मानसिक खच्चीकरण करणारा जिहाद आहे. पुढे अश्या फसलेल्या स्त्रियांचा लिलाव करणे, रखेल बनवणे इत्यादी प्रकार घडतात. ही इस्लामी परंपरा इस्लामचा उदय झाल्यापासूनची आहे. स्वतः प्रेषिताने अश्या महिलांना रखेल बनवून ठेवले होते याचे संदर्भ हदीज मध्ये पडून आहेत. आफताब सुद्धा श्रद्धा वालकरचा खून केल्यावर - मला स्वर्गात जागा मिळेल, ७२ हुरे मिळतील हीच भाषा करत होता. कारण हीच भाषा कुराण व हदीज मधून शिकवली जाते. 


एक समाज म्हणून हे आव्हान संपूर्ण सनातन-हिंदूंसमोर आहे. परंतु ब्राह्मण समाज एक प्रभावशाली समाज असल्याने या समाजातील स्त्रियांवर जास्तीची वक्रदृष्टी असणे साहजिक आहे. आम्हाला भगवद्गीता वाचून माहिती नसते, वाचली तरी कर्मयोग अध्यायापलीकडे समजून घ्यायच नसतं. आताच्या १५-३० वयोगटातील मुलांना रामायण-महाभारत माहिती नसते. बाकी वेदाध्ययन फार लांबची गोष्ट आहे. अश्या स्थितीत आपल्या पौराणिक पात्रे आणि देवदेवतांवर वाट्टेल ती चेष्टा करणे. बुद्धिभेद करणारा तर्क उभा करून स्वधर्माची टवाळी करणे असे विषय चालतात. स्वतः घरातील मंडळी आपल्या पाल्याकडे धार्मिक बाबींवर चर्चा करणे हे विषय टाळतात. आणि कोणी पाल्याने विचारलंच तर अभ्यासावर/कामावर लक्ष दे, या भानगडीत तू पडू नकोस अशी ऑर्डर निघते. यात मग पुढे जाऊन वेगळं काहीतरी हवं असत. अश्यावेळी भावनेचा बुरखा पांघरलेला अब्दुल समोर येतोच. कारण अश्याच सावजाची तो शिकारी वाट बघत असतो. मग असा अब्दुल तुमचा धर्म/देव कसा निरुपयोगी व मर्यादित आहे व आमचा अल्लाह किती पवित्र व अमर्यादित आहे हे सांगायला सुरुवात करतो. आणि मग आम्हालाही ते हळूहळू पटू लागते. कारण इस्लाम हा शब्द उच्चारायला सुद्धा आमच्या घरात बंदी असते. अश्यावेळी त्याबद्दल जास्तीचे कुतूहल वाटत जाणे हा मानवी स्वभाव आहे. आणि कुठे असा बोलायचा प्रसंग आलाच तर आम्हाला सत्यापेक्षा धार्मिक सलोखा जास्त महत्वाचा वाटू लागतो. थोडक्यात आम्हीच आम्हाला कमकुवत केले आहे. आम्हीच आमच्या पायात बेड्या घालून ठेवल्या आहेत. कोणीतरी म्हटलेलंच आहे की समोरचा तुम्हाला तोवर अपमानीत करू शकत नाही जोवर तुम्ही त्याला मदत करत नाही. मग अशा तुमच्यातील त्रुटींचा फायदा एखाद्याने घेतला तर फक्त तो दोषी अस म्हणता येणार नाही. कारण आमचे संरक्षण आम्ही केलं पाहिजे. चोर हा चोरी करणारच, आपण आपल्या घरातील वस्तू कश्या सांभाळाव्या हे आपल्या हातात आहे. असो!


आता फार खोल न जाता सर्वप्रकारच्या जिहादी आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन उपाय सांगणे मला रास्त वाटते. कारण रोगाची जास्त वेळ मीमांसा करण्यापेक्षा उपचार मला महत्वाचा वाटतो. 


१) स्वधर्माविषयी आत्मविश्वास आणि आदर

जिहादी लोक आपल्या धर्मातील संवेदनशील भागांवर बोट ठेऊन आपली दिशाभूल करण्यात आणि बुद्धिभेद करण्यात पटाईत असतात. जसे की, एवढे कोटी देव हवेत कशाला एकच पॉवरफुल नाही का? तुमचा राम स्वतःच्या बायकोचे रक्षण करू शकत नाही - तो तुमचे काय करणार? अशाप्रकारे बुद्धिभेद चालू होतो. त्यामुळे स्वधर्म जाणून घेणे, त्यावर अखंड विश्वास असणे आणि कोणत्याही स्थितीत गोंधळून न जाता थोरांकडे आपले विचार व्यक्त करणे, धार्मिक ग्रंथ स्वतः ताडून बघणे, हे काम पालक व पाल्य या दोघांनी करणे गरजेचे आहे. 


२) इस्लाम विषयी परिपूर्ण माहिती -

जसे त्यांना आपल्या धर्मातील संवेदनशील भाग माहिती आहेत तसेच आपल्याला त्यांचे संवेदनशील भाग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहेत. अशी माहिती सोशल माध्यमात उपलब्ध आहे. बऱ्याच इस्लाम सोडलेल्या लोकांनी यावर भाष्य करून ठेवलेलं आहे. कुराण-हदीज च्या प्रति इंटरनेट वर फुकट उपलब्ध आहेत. इस्लामची खरी माहिती तुम्हालाही माहिती असेल तर असा कोणी जिहादी समोर आल्यास त्याला तोडीस तोड उत्तर मिळाल्यावर तो परत तुमच्या नादी लागणार नाही. आणि हे मी स्वानुभवातून सांगत आहे. त्यामुळे अश्या जिहादचा अभ्यास त्यांची विचारधारा तपासणे आणि त्याला प्रतिउत्तर तयार ठेवणे हे आपल्या हातात आहे.


वास्तविक एक तलवारीच्या जोरावर असलेला जिहाद सोडला तर इतर सर्वप्रकारचा जिहाद तुम्ही फक्त इस्लाम वाचून म्हणजेच कुराण व हदीज वाचून मोडून काढू शकता आणि हे सहज शक्य आहे. एकदा कुराण समजलं तर मग अब्दुल समजायला आपल्या मुलीला फार अवघड जाणार नाही. त्यामुळे ही डोंगरासारखी वाटणारी समस्या एकदम छोटी वाटू लागेल. आणि याचा नायनाट किमान समाज पातळीवर करता येईल.

धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...