सांख्ययोग
अर्जुनाचा विषाद ऐकून प्रथम श्रीकृष्ण म्हणतात, एका प्रगतशील मूल्यांचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला असा विचार शोभत नाही. हा नामर्दपणा आहे! हे मानसिक दुबळेपण आहे..! आणि ह्या गोष्टी मनुष्याच्या दुष्कीर्तीस कारणीभूत होतात..! हे ऐकून अर्जुन द्विधा मनस्थितीत म्हणतो स्वकीयांच्या रक्ताने हे हात माखलेले चांगले दिसणार नाहीत, याने कोणता धर्म साध्य होणार आहे? अशांत झालेला अर्जुन भगवंताकडे याचना करतो की "मला उपदेश करा"

भगवंत उत्तरादाखल म्हणतात, हा शोक व्यर्थ आहे कारण ज्ञानी लोक जिवंत अथवा मेलेल्यांच्या बद्दल शोक व्यक्त करत नाहीत. कारण अश्या लोकांना आत्मा आणि भौतिक देह यातील फरक माहिती असतो, आत्मा हा निरंतन व शाश्वत आहे याचे ज्ञान असते! म्हणूनच भगवान म्हणतात,' ज्याकाळी मी, तू व हे राजे नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि यापुढे होणार नाही असाही कोणता काळ नाही..!'

भगवंत हे विश्लेषण करताना म्हणतात, नाम व गुण हे कायम राहतात. एकाचे दुसऱ्यात रूपांतर होत राहते, व्यक्त स्थितीतून अव्यक्त स्थितीत तर अव्यक्त स्थितीतून व्यक्त स्थितीत रूपांतर होण्याची प्रक्रिया कायम चालू असते..! जेंव्हा आपण म्हणतो की एखादी वस्तू नष्ट झाली तेंव्हा ती खऱ्या अर्थाने नष्ट झालेली नसून ती अव्यक्त स्वरूपात गेलेली असते...! उदाहरण द्यायच झालं तर बल्ब चा शोध लागला याचा अर्थ तो त्या आधी लागला नसता असंही नाही किंवा पुढे लागला नसता असंही नाही. थोडक्यात बल्ब बनण्यासाठी लागणारे गुण जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्याला व्यक्त स्वरूप प्राप्त होते..! म्हणूनच याला वेळेचं बंधन नाही! आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला "तू त्रिगुणतीत हो" असा उपदेश करत आहेत..!

भगवंत पुढे म्हणतात, मनुष्य गुणकर्माने बाध्य असतो आणि म्हणूनच कर्मबंधनातून मुक्तता हे मनुष्य ध्येय आहे. म्हणूनच कोणत्याही फळाची, आसक्तीची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हेच योग्य होय! जो जन्मला आहे त्याला मृत्यू आहे. पण म्हणून कर्तव्य कर्माचे पालन टाळणे योग्य नाही! आत्मा हा अमर्त्य असल्याने शोक करण्याची आवश्यकता नाही..! म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, क्षत्रिय म्हणून जे तुझे कर्तव्य आहे तोच तुझा धर्म आहे त्याचे पालन हाच मोक्षप्राप्ती देणारा मार्ग आहे. सर्व चांगल्या अथवा वाईट कर्माच्या बंधनातून मुक्तता हाच योग आहे!

थोडक्यात, स्वर्गप्राप्ती हे सुद्धा ध्येय नाही; कारण चांगल्या कर्माने स्वर्ग प्राप्ती होईल खरी परंतु ती सुद्धा कर्माने बाध्य असेल; तो मोक्ष नाही, चांगले कर्म केले म्हणून त्याचे चांगले फळ मिळेल पण ते सुद्धा कर्मच आहे त्यात देखील चांगलं काहीतरी मिळण्याची आसक्ती आहे..! म्हणून भगवंतांनी चांगल्या कर्मापासून सुद्धा मुक्ती मिळवण्यास सांगितले आहे.! यासाठी कर्मयोग, भक्तियोग गरजेचा आहे...!

~२~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...