अर्जुन विषाद योग



महाभारत ही न्याय आणि अन्याय, नीती व अनीती, सत्य आणि असत्य, विचार आणि कुविचार, धर्म आणि अधर्म यांच्यातील द्वंद्व होय अशी माझी धारणा आहे. नाना प्रसंग, घटना यांना सामोरे जाऊन शेवटी कृष्ण शिष्टाई देखील अयशस्वी होते तेंव्हा युद्ध होते. रामायणात राम रावणाला सर्व बाजूने समजावण्याचा, शिष्टाईचा यत्न करून पाहतो आणि सर्व मार्ग जेंव्हा बंद होतात तेंव्हा युद्ध सुरू होते.. महाभारतात देखील तेच आहे कृष्ण अगदी पाच गावांवर पांडव समाधानी असतील हे सांगतो तेंव्हा अहंकारी दुर्योधन सुई च्या अग्राइतकी देखील जमीन द्यायला नकार देतो! आणि सर्व मार्ग संपतात तेंव्हा युद्ध स्थिती निवडली जाते.

ही सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे..! हीच अहिंसा आहे..!

अर्जुनाला ऐन युद्धात आप्तेष्ट बघून मोह अनावर होतो आणि तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवतो..! आणि श्रीकृष्णाला म्हणतो "हे पाप मी करणार नाही, याने कुळाचार, कुळधर्म नष्ट होईल. पुढे जाऊन हे जग मला लोभी म्हणेल..! आणि शस्त्र घेऊन स्वकीयांशी लढण्यापेक्षा प्रतिकार न करता स्वकीयांच्या कडून मरण आले तरी चालेल..!" अश्या प्रकारची मानसिकता अर्जुनाच्या मनात निर्माण होते आणि यालाच तो अहिंसा, धर्म समजून बसतो.
धर्म, नीती, न्याय, सत्य, अहिंसा, विचार यांच्या बद्दल भ्रम झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण पुढील सतरा अध्यायात संपूर्ण धर्म सांगतात..! कर्तव्याची आठवण करून देतात! आपल्या प्रेमळ, अमोघ शैलीत, अगम्य स्वरूपात भगवंतांचे हे भाष्य प्रत्येक मनुष्याला मंथन करायला लावणारे आहे. कारण संपूर्ण जगात हे एकमेव असे भाष्य आहे ज्यात "भगवान उवाच" आहे..! अर्जुनाने मांडलेला विषाद आणि त्यावर विशद केलेले भगवंताचे भाष्य हे स्पृहणीय आहे. या अर्जुन-कृष्णाच्या संभाषणातून मला जी भगवद्गीता समजली आहे आणि समजते आहे त्याचे विवेचन रोज मांडायचे आहे..!

~१~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...