द काश्मिर फाइल्स - एक वेगळी बाजू

द काश्मिर फाइल्स

30 वर्षांनी का होईना, पण एक क्रूर सत्य दाखवण्याच धाडस कोण तरी करून दाखवलं! त्यासाठी खरंतर विवेक अग्निहोत्री टीम चे अत्यंत आभार! 
तस तर Social मीडिया वर बऱ्याच पोस्टीं पडत आहेत, पण मला थोडी वेगळी बाजू मांडायची आहे. आणि ती म्हणजे त्यातून दाखवलेल्या विविध सिम्बॉलीक वाक्यांची! खरतर हा चित्रपट काढणे हेच शिवधनुष्य होतं. कारण इतक्या घटना दोन अडीच तासात सामावून घेणं त्यांची विविध पैलूंनी रेखाटन करणं हे खरंच अवघड होतं, आणि यासाठी एक दिग्दर्शक म्हणून अग्निहोत्री च कौतुक करावं तितक थोडं आहे.
आता विविध पैलू-
१. कश्यप आणि काश्मीर- खरंतर काश्मीर हे नाव कुणामुळे पडलं, त्याचा मागील इतिहास काय, अगदी शंकराचार्य पासून ललितादित्य पर्यंत काश्मीर कसा समृद्ध होता हे सांगितलं. हे खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. फ्री काश्मीर म्हणून विधवा विलाप करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे.

२. काश्मिरी पंडितांनी तर कधी हातात बंदूक घेतली नाही-
वास्तविक, एक narrative ,चालवला गेला, आजही चालवला जातो की गरिबी मुळे, Suppress किंवा oppress केल्याने काश्मीर युथ भडकतो आणि बंदूक घेतो असा एक गोंडस युक्तिवाद मीडिया मध्ये केला जातो. तो या एका वाक्यात ध्वस्त केलेला आहे. Oppress तर काश्मिरी पंडित पण झाले, पण त्यांनी कधी बंदुका घेतल्या नाहीत हातात! इथे विषय संस्कारांचा आहे!

3. ज्याचा शैक्षणिक केंद्रावर ताबा तो जगावर बौद्धिक राज्य करू शकतो- खरतर हे वाक्य काश्मीर पूर्वी विद्या आणि बौद्धिक याच प्रमुख केंद्र होत आणि त्याच्यावर यासाठी हल्ला केला अस सांगितलं गेलं, पण माझ्यामते याचा खरतर रोख पूर्णपणे JNU, AMU सारख्या संस्थांकडे होता हे कळून येतं, कारण JNU या संस्थेतून केंद्रीय इतिहास लिहिला जातो, research होतात, काही प्रमुख degree ह्या तिथूनच दिल्या जातात आणि विस्थापित झाल्यानंतर देशातील कंमुनिस्ट लोकांनी तिथं हळूहळू जम बसवला आणि आपला Narrative पसरवला, आणि सोयीस्कर इतिहास लिहिला गेला, जस की जम्मू काश्मीर मध्ये ललितादित्य बद्दल, कश्यप ऋषींच्या बद्दल काही शिकवलं जातं नाही. तिथं महाराणा प्रताप, विक्रमादित्य, चंद्रगुप्त बद्दल फारसं सांगितलं जाणार नाही.

४. सरकार कोणतंही असो system आपली आहे- 
System म्हणण्यापेक्षा आपण Eco सिस्टिम म्हणू. तस 2000 साली सुद्धा सरकार BJP च होत पण Eco system तीच होती. 2014 पूर्वीपासून एक अशी eco system जी केंद्रात आणि राज्यात कोण मंत्री होणार हे ठरवत असे, अगदी पंतप्रधान पदाला बगल देऊन. ही System आजही बऱ्याच भागात जिवंत आहे, आणि त्यांची Establishment आहे. यालाच प्रस्थापित म्हणतात!

५. आताच्या पंतप्रधान (मोदी) ना मोहोब्बत नकोय, जी नेहरू, वाजपेयी ना हवी होती-
जम्मूरियत, काश्मीरीयत करत नेहरू पासून वाजपेयी पर्यंत पंतप्रधान झाले. पण काश्मीर चा हा नरसंहार त्यावर Solution कोण शोधू शकलं नाही, आणि भावनेच्या भरात किंवा प्रसिद्धी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी ठोस पावलं कोणी उचलली नाही. पण मोदी हा असा नेता निघाला ज्याला जम्मू आणि काश्मीर हवंय, जम्मूरियत, काश्मीरीयत वगैरे बोलघेवडे ढोंग नको, आणि 370 हटवून तेच दाखवलं गेलं, तर POK बाबत पण काही indication या सरकार ने दिले आहेत. 

६. मीडिया एक वेश्या, रखेल आहे-
एक अत्यंत क्रूर सत्य सांगण्याचे धाडस या वाक्यात आहे. चित्रपटातील पुनीत इस्सार जेंव्हा हे वाक्य बोलतो, तिथंच या चित्रपटाचं मेख आहे. मीडिया ही आजकाल पत्रकारिता राहिली नसून एक पैश्याचा धंदा करणारी मीडिया house बनली आहेत, आणि आपल्याला पैसे पुरवणाऱ्या मालकाचा अजेंडा ती चालवत असतात हे आजपर्यंत लोकांना कळलं आहेच, पण या चित्रपटात ते धडधडीत बोलून दाखवलं गेलं!

७. फक्त कश्मिरी पंडित नाही, तर दलित, ख्रिश्चन, शीख आणि इतर पण - होय जास्तीचं पलायन आणि रोख हा काश्मिरी पंडित असला तरी इतर वर्गीय लोक सुद्धा काश्मीर सोडून पळाले हे ही सत्य दाखवलं गेलं👌

८. ज्यू लोकांनी अत्याचार जगाला विसरवू दिले नाहीत- 
खरंतर चित्रपटात याच उत्तर नीटसं दिल नाही पण इथे देतो. ज्यू जेंव्हा जेरुसलेम किंवा नाझी जर्मनी मधून पळाले ते इतर युरोप व अमेरिकेत स्थायिक झाले पण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, आणि त्यांचा विज्ञान, संस्था शैक्षणिक संस्था इथं आधीपासूनच ताबा होता त्यामुळे त्यांचा अत्याचार दाबणार कोण? आइन्स्टाइन हा स्वतः ज्यू होता. असे बरेच शास्त्रज्ञ अमेरिकेसाठी राबत होते, त्या त्या देशासाठी राबत होते. त्यामुळे ज्यू च्या बाबतीत लागलेला नियम इथं लागू होत नाही.😢

धन्यवाद
- अनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...